कांदा भजी / Kanda Bhaji

१०-१२ भजी साठी साहित्य: २ मोठे कांदे - पातळ उभे स्लाईस करून घ्या. ४ टीस्पून बेसन १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद  १/२ टीस्पून जीरा पावडर...


१०-१२ भजी साठी
साहित्य:
२ मोठे कांदे - पातळ उभे स्लाईस करून घ्या.
४ टीस्पून बेसन
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद 
१/२ टीस्पून जीरा पावडर
१/२ टीस्पून ओवा 
१/२ कप ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली 
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मीठ
कृती:
  • एका मोठ्या बाउल मध्ये चिरलेला कांदा, चवीपुरते मीठ, लाल तिखट, हळद, जीरा पावडर, ओवा, कोथिंबीर घेऊन मिक्स करावे. मिश्रण 20 मिनिट झाकून ठेवावे.
  • मिश्रणाला मीठ आणि कांद्यामुळे पाणी सुटेल. त्यात थोडे थोडे बेसन घालावे. मिश्रण बनवताना पाणी घालायची गरज नाही. पाणी घातल्यामुळे भजी कुरकुरीत होत नाहीत.
  • बेसन थोडे कमी घातल्यामुळे कांदा छान तळला जातो आणि भजी कुरकुरीत होते. तेल गरम करून त्यामध्ये हाताने किवा चमच्याने छोट्या छोट्या भाजी सोडाव्यात आणि छान लाल रंग येईपर्यंत तळाव्यात.
  • सोस सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे. 

Post a Comment

emo-but-icon

Stay Connected!

social media

Subscribe to my YouTube Channel!

item